दि. 05/09/2020 संगमनेर तालुक्यात कोरोनाचा तांडव एकाच दिवसात सापडले तब्बल 80 रुग्ण प्रशासन व्यस्त - नागरिक बेशिस्त संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाने तांडव घातला असून काल शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये एका दिवसात तब्बल ऐंशी रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. तसेच काल 48 जणांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान या भयानक वातावरणात प्रशासन इतरत्र व्यस्त असल्याचे दिसत आहे तर नागरिक मात्र बेशिस्त वागत असल्याने हा संसर्ग वाढतच चालला आहे. बेशिस्त नागरिकांना शिस्त लावायची कशी असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. संगमनेर तालुक्यात आत्तापर्यंत 1 हजार 895 जणांना आत्तापर्यंत बाधा झाली असून सद्यस्थितीला 191 जणांवर उपचार सुरु आहेत तर 27 जणांचा मृत्यू झाला असून 1677 जणांनी कोरोनावर मात केली आहे. काल उशिरा आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील 36 वर्षीय महिला, 58 वर्षीय महिला, माळीवाडा येथील 18 वर्षीय तरुणी, 18 व 21 वर्षीय तरुण आणि 45 वर्षीय महिला, जनता नगर येथील 41 वर्षीय वर्षीय पुरुष, वाडेकर गल्ली येथील 27 वर्षीय तरुण, गणेश नगर येथील 65, 75 वर्षीय वृध्दा, साई श्रध्दा चौक येथील 42, 44 व 59 वर्षीय पुरुष, बाजारपेठ येथील 31 वर्षीय इसम, शिवाजीनगर येथील 36 वर्षीय इसम, मालदाड रोड येथील 9 वर्षीय बालिका, 24 वर्षीय तरुण व 32 वर्षीय महिला असे अठरा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. शहराबरोबरच तालुक्यातील घुलेवाडी येथील 47, 50 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, 10 वर्षीय बालिका, कौठे धांदरफळ येथील 50 वर्षीय महिला व 50 वर्षीय पुरुष, रायते येथील 6 वर्षीय बालिका, 17, 21 वर्षीय तरुणी, 35, 38, 45 व 68 वर्षीय महिला आणि 40 वर्षीय पुरुष, चिखली येथील 70 वर्षीय वृध्द, कनोली येथील 42 वर्षीय पुरुष, चिंचपूर येथील 57 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय तरुणी, वाघापूर येथील 27 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी, 10 वर्षीय बालक आणि 59 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथील 25 व 39 वर्षीय इसम, समनापुर येथील 39 वर्षीय इसम, मंगळापूर येथील 14, 16 वर्षीय मुले व 38 वर्षीय महिला, आंबी दुमाला येथील 50 वर्षीय पुरुष, निमोण येथील 90 वर्षीय वृध्द, 30 वर्षीय महिला, ढोलेवाडी येथील 38 वर्षीय इसम, चिकणी येथील 58 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय तरुणी, बोरबन येथील 9 वर्षीय बालक, कुरकुटवाडी येथील 48, 55, 43 वर्षीय महिला व 26, 28, 45 वर्षीय पुरुष, माळवाडी येथील 01 वर्षीय बालक, 03 वर्षीय बालिका, 18, 28 वर्षीय तरुण, 25 वर्षीय तरुणी, 52, 48 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय वृध्दा आणि 48 वर्षीय महिला, कौठे बुद्रुक येथील 17 वर्षीय तुरुणी, 35 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष व 80 वर्षीय वृध्दा, माळेगाव पठार येथील 21 वर्षीय तरुणी व 60 वर्षीय महिला, मनोली येथील 13 वर्षीय बालक, 35, 69 वर्षीय पुरुष आणि 64 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 37 व 41 वर्षीय पुरुष असा बासष्ठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे कालची एकूण संख्या ऐंशी झाली आहे.