अवश्य वाचा


  • Share

संगमनेर कोरोनाच्या विळख्यात आज पुन्हा 21 जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेरला कोरोना आपला विळखा अधिक घट्ट करत असून काल दिवसभरात 57 रुग्ण सापडल्यानंतर आज शनिवार दि. 1 ऑगस्ट रोजी उशिरा आलेल्या रिपोर्ट मध्ये खाजगी प्रयोगशाळेतील 5 तर रॅपिड अँटीजन टेस्टमधून 16 असे एकूण 21 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रिपोर्ट मध्ये संगमनेर शहरातील घास बाजार येथील 77, 51, 68 वर्षीय महिला व 72 वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथे 81 वर्षीय पुरुष व 71 वर्षीय महिला, मालदाड रोड येथील 29 वर्षीय महिला, शहरातील पोलिसांची वसाहत असणाऱ्या अकोले रोड वरील पोलीस कॉलनी येथील 23 व 22 वर्षीय तरुणी, संजय गांधी नगर येथील 32 वर्षीय इसम, लालतारा हौसिंग सोसायटी येथील 21 व 18 वर्षीय तरुणी, 15 वर्षीय मुलगा, 43 वर्षीय पुरुष, विद्या नगर येथील 60 वर्षीय महिला असे 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच तालुक्यातील सुकेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 23 वर्षीय तरुण, नांदूर खंदरमाळ येथील 27 वर्षीय तरुणी, खराडी येथील 27 वर्षीय तरुण व आज नव्यानेच खांबा येथे 55 वर्षीय पुरूष व चंदनापुरी येथिल 79 वर्षीय पुरुष असे 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. संगमनेर तालुक्याची आत्तापर्यंत ची रुग्णसंख्या 779 झाली आहे. लवकरच हा आकडा हजारी पार करण्याचे दृश्य दिसत आहे.