अवश्य वाचा


  • Share

संगमनेरात संध्याकाळी पुन्हा 30 रुग्णांची भर आजची एकूण संख्या 57 आज एकूण 12 पोलिसांनाही कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेरात सुरु असलेला कोव्हीड 19 चा कहर आज दिवसभर चालूच राहिला. सायंकाळ पर्यंत 27 रुग्ण सापडल्यानंतर आता आलेल्या अहवालात 30 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे आजची एकूण संख्या 57 झाली आहे. तर यामध्ये अगोदर आलेल्या रिपोर्ट मध्ये 4 पोलिसांना बाधा झाली होती आताच्या आलेल्या रिपोर्ट मध्ये आणखी 8 पोलिसांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आज 12 पोलिसांना बाधा झाली आहे. आज संध्याकाळी आलेल्या अहवालात संगमनेर शहरातील अकोले नाका येथील 53 वर्षीय पुरुष, अकोले रोड येथे 38 वर्षीय महिला, नवीन नगर रोड येथील 61 वर्षीय महिला, जम जम कॉलनी येथील 17 वर्षीय तरुण, 40 वर्षीय इसम व 13 वर्षीय मुलगी, मालदाड रोड येथील 35 वर्षीय पुरुष 29, 45 वर्षीय महिला, घास बाजार येथील 75 वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथील 42 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरुण, शिवाजी नगर येथील 27 वर्षीय तरुण असे 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तालुक्यातील कनोली येथील 30 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 43 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 46 वर्षीय इसम, निंबाळे येथील 30 वर्षीय महिला व 15 मुलगी, आंबी खालसा येथील 12, 16, 18, 37 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 35, 37, 42, 53, 51, 50 वर्षीय पुरुष व 33 वर्षीय महिला असे 16 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. संगमनेर तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 758 जणांना बाधा झाली असून 527 जणांनी यशस्वी मात केली आहे तर 212 रुग्णांवर उपचार सुरू आहे आणि 19 जनांनी आपला जीव गमावला आहे. तालुक्यात 333 सर्वाधिक संख्या संगमनेर शहरातील असून कुरण 58, निमोण 57, घुलेवाडी 48, गुंजाळवाडी 19 एवढी रुग्णसंख्या आहे.