अवश्य वाचा


  • Share

आ. बाळासाहेब थोरात, जयंत पाटील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

मुंबई (प्रतिनिधी) - अल्पमतातील फडणवीस सरकार अखेर कोसळल्याने राज्यात महाविकास आघाडीचे नवीन सरकार स्थापन होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून उपमुख्यमंत्री म्हणून संगमनेरचे सुपुत्र व काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे दोघे शपथ घेणार आहेत. बाळासाहेब थोरातांची उपमुख्यमंत्री पदी निवड होणार असून या निवडीने काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. संगमनेरात पुन्हा दिवाळी सुरू होत आहे.