दि. 20/11/2020 संगमनेरमध्ये पुन्हा कोरोनाची लाट. गर्दी आणि निष्काळजी भोवली आजही तब्बल 46 जणांना कोरोनाची बाधा !! शहरातील 19 तर ग्रामीण भागातील 27 जणांना बाधा. संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्याला दिवाळीच्या गर्दीने चांगलाच मोठा फटकार दिला आहे. नागरिकांच्या आनंदाच्या भरात बेशिस्तपणामुळे दिवाळीनंतर रोज सरासरी पन्नास कोरोना बाधित रुग्णाची भर पडत आहे. यामध्ये आज शुक्रवारीही तब्बल 46 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. यामध्ये संगमनेर शहरातील 19 जनांचा समावेश आहे तर 27 रुग्ण तालुक्यातील ग्रामीण भागातील आहेत. आज आलेल्या अहवालामध्ये संगमनेर शहरातील 4 महिला, स्वामी समर्थ नगरमधील 1 महिला, वकील कॉलनी येथील 1 पुरुष, राहानेमळा येथील 2 पुरुष, मोमीनपूरा येथील 2 महिला, बालाजी नगर येथील 1 पुरुष, रंगार गल्ली येथील 1 महिला, नेहरू चौक येथील 1 पुरुष, गोल्डन सिटी येथील 1 महिला, 1 पुरुष, इंदिरानगर येथील 1 महिला, शिवाजीनगर येथील 1 पुरुष, जनता नगर येथील 1 महिला व विजय नगर येथील 1 महिला यांचा समावेश आहे. तर तालुक्यातील कनोली येथील 1 महिला, 1 पुरुष, खळी येथील 2 पुरुष, 3 महिला, निमगाव खुर्द येथील 2 महिला, 2 पुरुष, सावरचोळ येथील 1 महिला, आंबी खालसा येथील 1 महिला, निमगाव भोजापूर येथील 1 महिला, उंबरी बाळापूर येथील 1 पुरुष, मेंढवन येथील 1 पुरुष, जोर्वे येथील 1 पुरुष, निमगाव जाळी येथील 1 महिला, गुंजाळवाडी येथील 1 पुरुष, निमोण येथील 1 महिला, सुकेवाडी येथील 1महिला, 2 पुरुष, साकुर येथील 1 पुरुष, शेडगाव येथील 1 पुरुष, कोंची 1 पुरुष, रहीमपूर 1 पुरुष असा 27 जनांचा समावेश आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 46 झाली आहे. अशाच प्रकारे रुग्णाची संख्या वाढत राहिल्यास प्रशासन कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे.. . येथे जाहिरातीसाठी संपर्क करा 02425-225129 / +917498171178