दि. 06/10/2020 कोरोनाची आजही जोरदार उसंडी 49 जणांना केले बाधित तालुक्याची एकूण संख्या साडेतीन हजार पार संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून आजही संगमनेर शहर व तालुक्यात जोरदार मुसंडी मारत तब्बल 49 जणांना बाधित केले आहे. आजही शहरापेक्षा ग्रामीण भागातील संख्या जास्त आहे. त्यामुळे शहरात वीश्रांती घेतलेल्या कोरोनाने ग्रामीण भागाच्या चिंता वाढविल्या आहेत. आज आलेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील पंचायत समिती परिसरातील 40 वर्षीय तरुण, घोडेकर मळ्यातील 30 वर्षीय महिला, देवाचा मळा परिसरातील 23 वर्षीय तरुण, माळीवाड्यातील 64 वर्षीय महिला, विद्यानगर परिसरातील 46 वर्षीय तरुण व संगमनगर मधील 69 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय तरुण यांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहाराबरोबरच तालुक्यातील सांगवी येथील 67 व 47 वर्षीय महिला, निमगाव पागा येथील 65 वर्षीय महिला, शेडगाव येथील 41 वर्षीय तरुण, खंदरमाळवाडी येथील 45 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 52 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण व 42 वर्षीय महिला, कवठे बुद्रुक येथील 32 वर्षीय तरुणासह 25 वर्षीय महिला, नांदूर खंदरमाळ येथील 65 व 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, उंबरी बाळापूर येथील 60 वर्षीय महिलेसह 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 33 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 44 वर्षीय तरुण, माळेगाव हवेली येथील 40 वर्षीय तरुण, तर गुंजाळवाडीत आज कोविडचा उद्रेक झाल्याचे दिसून आले असून तेथून तब्बल बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात 85 व 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 35, 28 व 20 वर्षीय तरुण तसेच 60, 40, 35, 30, 25 व 18 वर्षीय महिला व बारावर्षीय बालिका, सुकेवाडी येथील 55 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय तरुण, निमगाव भोजापूर येथील 45 वर्षीय महिला, समनापुर येथील 51 वर्षीय इसम, हंगेवाडी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसम, घुलेवाडी येथील 61 व 52 वर्षीय इसम, वडगाव पान येथील 52 वर्षीय इसम, पळसखेड येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 67 वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथील 31 वर्षीय तरुणासह 31 वर्षीय महिला व रायतेवाडी येथील 39 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे आजची एकूण संख्या 49 झाली आहे. आत्तापर्यंत बाधितांची संख्या 3504 वर जाऊन पोहोचला आहे.