अवश्य वाचा


  • Share

जिद्दीच्या जोरावर युवा पॉलीप्रींट उद्योग यशस्वी होईल - आ. थोरात

े संगमनेर (प्रतिनिधी) सर्वसामान्य शेतकर्‍याच्या मुलाने नोकरीच्यामागे न लागता मोठ्या जीद्दीने पत्रकारीता व त्यानंतर उद्योग व्यवसायात पदार्पण केले. त्याचबरोबर मुलांनाही उद्योग व्यवसायासाठी उभारी दिली. त्यातुन अहमदनगर जिल्ह्यातील युवा पॉलीप्रिंट अ‍ॅण्ड पॅकेजिंग इंडस्ट्रिज या उद्योगाची उभारणी झाली. प्रचंड जिद्द व परिश्रमाच्या जोरावर हासे परिवाराचा हा उद्योगही यशस्वी होईल असे प्रतिपादन राज्याचे माजी महसुलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये दै. युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे, इंजी. आनंद हासे, इंजी. सुदिप हासे यांच्या युवा पॉलीप्रिंट अ‍ॅण्ड पॅकेजिंग इंडस्ट्रीजचे उद्घाटन काल रविवारी आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर आ. डॉ. सुधीर तांबे, आ. वैभवराव पिचड, उद्योजक राजेश मालपाणी, जि. प. कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, महाराष्ट्र बँकेचे चिफ मॅनेजर किशोर कुलकर्णी, रंजन दुधचे विलास उंबरकर, यशोदेव पतसंस्थेचे संस्थापक प्रदिपभाई शहा, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन भाऊसाहेब एरंडे उपस्थित होते. या वेळी बोलतांना आ. थोरात म्हणाले, किसन भाऊ हासे यांनी साप्ताहिक संगम संस्कृती आणि दै. युवावार्ताच्या माध्यमातुन नि:स्वार्थी पत्रकारीता केली. त्याचबरोबर रबर स्टँप, छपाई उद्योग हा व्यवसाय केला. प्रचंड जिद्द व मेहनतीच्या जोरावर या व्यवसायत यश मिळवत दोन्ही मुलांना पदव्युत्तर इंजीनिअर केले. आज त्यांच्या दोन्ही सूनाही पदव्युत्तर इंजिनिअर आहेत. हासे या इंजिनिअर कुटूंबाने हा पॉलीप्रींन्ट अ‍ॅण्ड पॅकेजींग इंडस्ट्रिज उद्योग उभारला हे इतरांसाठी निश्‍चीत प्रेरणादायी आहे. आ. डॉ. सुधीर तांबे यांनीही साप्ता. संगम संस्कृती, दै.युवावार्ताची वाटचाल व त्याचे यश सांगून या नविन उद्योगास शुभेच्छा दिल्या. आ. वैभवराव पिचड यांनी या उद्योगाचे महत्व विषद करत इंजी. आनंद हासे यांच्या धाडसाचे कौतुक करीत या उद्योगास शुभेच्छा दिल्या. उद्योजक राजेश मालपाणी यांनी किसन भाऊ हासे यांच्या संघर्षमय वाटचालीचे कौतूक केले. हासे यांनी संयम ठेवत मोठ्या कष्टाने आज उद्योग क्षेत्रात यश मिळविले आहे. आनंद हासे यांनी नोकरी सोडून उद्योजक बनल्याबद्दल त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदिपभाई शहा, भाऊसाहेब एरंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत किसन भाऊ हासे यांनी केले. प्रास्ताविक संचालक आनंद हासे यांनी केले तर आभार प्रा. सुदीप हासे यांनी मानले. सुत्र संचालन निलेश पर्बत यांनी केले. या प्रसंगी या उद्योगास सहकार्य करणार्‍या सर्व मान्यवरांचा हासे परीवारच्या वतीने पाहूण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी विठ्ठल पवार, भाऊसाहेब कुटे, रोहीदास खटाटे, आर.एम.कातोरे, दिलीपराव शिंदे, नामदेव गुंजाळ, आर.डी. चौधरी, नरेंद्र लचके, सौ. सुनंदा दिघे, सुकदेव इल्हे, प्राचार्य कानवडे, दत्ता अभंग, गजेंद्र अभंग, अजय जाजू, वसंत बंदावणे, जीजाबा हासे, ग.स. सोनवणे, अ‍ॅड.कैलास हासे. कळसकर गुरूजी, संदिप फटांगरे, सुरेशराव आहेर, कैलासराव जमदाडे, जगन्नाथ घुगरकर, हरीभाऊ चकोर, श्री. देव्हारे, पो. नि. भोसले, यांच्यासह या उद्योग, सामाजिक, राजकीय शैक्षणीक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दै. युवावार्ता व युवा पॉलीप्रिंट अ‍ॅण्ड पॅकेजींग इंडस्ट्रीज मधील सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. उद्योजक आनंद हासे व परिवाराचा आहेर, सहाणे, जमदाडे, देवकर, वावळे, भोर, हासे या पाहूण्यांनी सन्मान केला.