अवश्य वाचा


  • Share

अल्पवयीन मुलाची धाडसी चोरी

संगमनेर (प्रतिनिधी) शहरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील पोस्ट कार्यालयात एका अल्पवीयन मुलाने झाडावर चढून खिडकीतून प्रवेश करत धाडसी चोरी केली. यावेळी त्याने कार्यालयातील लॉकरमधील 3 हजार 547 रूपये रोख रक्कम व 6 मोबाईलची चोरी केली. ही घटना सोमवारी सकाळी टपाल कार्यालय उघडल्यानंतर कर्मचार्‍यांच्या लक्षात आली. या प्रकरणी शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की पोस्ट मास्टर संपत सिताराम शिंगाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीच्यात म्हटले आहे की दि. 17 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कार्यालय बंद करून चावी बरोबर घेऊन घरी गेलो होतो. त्यानंतर दि. 18 व 19 रोजी कार्यालयाला सुटी होती. दि. 20 रोजी सकाळी साडेसात वाजता कार्यालयाचे कुलूप उघडून आत गेलो असता, आतील लोखंडी लॉकरचे कुलूप तुटलेले दिसले. त्यातील साहित्याची उचकापाचक केलेली दिसली. या लॉकरमधून रोख रक्कम व कर्मचार्‍यांचे शासकीय मोबाईल चोरीला गेलेले लक्षात आले. यावेळी कार्यालयात पाहिले असता मागील खिडकीची काच फुटलेली दिसून आली. यावरून कुणीतरी अज्ञात चोर खिडकीतून आत आल्याचे व चोरी करून निघून गेल्याचे लक्षात आले .ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाने कबुली देत चोरलेले मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिले.