अवश्य वाचा


  • Share

प्रांत कार्यालयात कारने घेतला पेट

संगमनेर ( प्रतिनिधी) शहरातील नविन नगर रोड, येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीच्या पार्किंगध्ये उभ्या असलेल्या मारूती सुझीकी कंपनाच्या ए स्टार या कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे प्रशासकीय भवन परिसरात सर्वत्र एकच धावपळ उडाली. ही घटना आज सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. या प्रशासकीय भवनामध्ये विविध प्रकारचे शासकीय कार्यालय आहेत. त्यामुले या ठिकाणी नेहमीच मोठी वर्दळ असते. दरम्यान निमगावजाळी येथील दिपक शिवाजी डेंगळे हे आपल्या काही कामानिमित्त प्रांत कार्यालय आले होते. यावेळी त्यांनी आपली मारूती सुझूकी कंपनीची ए स्टार कार क्र.एम.एच. 17 ओ ई 5963 आवारात लावली होती काही वेळातच या कारने अचानक पेट घेतला. त्यामुळे परिसरात एकच धादंल उडाली. सदर वाहन जळत असतांना तेथील सफाई कर्मचारी व महिलांनी तात्काळ ही आग वीझविण्यासाठी पाणी, मातीचा गाडीवर मारा केला. तसेच गाडीच्या आजूबाजुला असणारी वाहने तात्काळ दुर केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्नीशमन दलानेे त्वरीत हालचाल करून पेटणारी गाडी विझविण्यात यश मिळविले. जवळच्या शासकीय कार्यालयात नेहमीन शासकीय कामानिमित्त मोठी गर्दी असते, अनेक विभागाच्या बैठका सदर कार्यालयात सुरू होत्या, अचानक गाडीने पेट घेतल्याने भयभित वातावरण निर्माण झाले मात्र अग्नीशमन दलाने पेटणार्‍या गाडीचा ताबा घेवून आग आटोक्यात आणली. दुसरीकडे अनेक जण या अगीचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. या आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले. कारला नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र अजून समसू शकले नाही.