अवश्य वाचा


  • Share

राष्ट्र सेवा दलाच्या श्रमसंस्कार शिबिराला 73 वर्षांशी परंपरा

अकोले (प्रतिनिधी) 1946-47 च्या दरम्यान अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील शेनीत व मुतखेल येथे राष्ट्र सेवा दलाचे श्रमसंस्कार शिबिराची परंपरा सुरू केली. तदनंतर 1972 पासून म्हणजेच 73 वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्यात अकोले शहरातील सर्वोदय छात्र निवास येथे सेवा दला कडून विद्यार्थ्यांसाठी श्रमसंस्कार, व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन केले जाते. शिबिराची परंपरा अखंडितपणे सुरू असून ‘समतेची गाणे गात’ व राष्ट्रीय एकात्मतेची पथनाट्य सादर करत यंदाच्या सहा दिवसांच्या शिबिराचा समारोप 25 मे रोजी झाला.1946 च्या शेनीत येथील शिबिरास दिवंगत साथी भास्करराव दुर्वे, अमृतभाई मेहता, सावळेराम दातीर, सखाराम येलमामे उपस्थित होते. तेव्हा श्रमदानातून रस्ता तयार करण्यात आला. मुतखेल येथील शिबिरातून डोंगरावर पिण्याचे पाणी गावात येण्यासाठी चर खोदण्यात आली होते. 1948 ला विठे येथे समाजवादी पक्षाचे शिबीर झाले, तेव्हा नानासाहेब गोरे व मधू दंडवते आले होते, 1972 ला रूंभोडी येथील शिबिराला बाबा आढाव यांनी मार्गदर्शन केले होते. 1977 ला शेकेवाडी येथील शिबिराला युक्रांदचे संस्थापक कुमार सप्तर्षी आले होते. 83 च्या शिबिराला परिट गुरुजी अकोल्यात दहा दिवस होते. भाई वैद्य, गंगाधरमामा गवारे, सुभाष वारे, असे अनेक मान्यवर आले होते. तालुक्यातील जवळ जवळ प्रत्येक गावात सेवा दलाची शिबिरे झाली आहेत. आणि या शिबिरांना साथी दशरथ सावंत, नारायणराव ऐखंडे, लक्ष्मण आव्हाड, विनय सावंत यांचे नेहमी मार्गदर्शन असते.1946 पासून दरवर्षी अकोले तालुक्यात उन्हाळ्यच्या सुट्टीत व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन केले जाते, यंदा 20 मे ते 25 मे या कालावधीत हे शिबीर पार पडले. समता, न्याय, बंधुभाव आणि स्वातत्र्य या विचारांचे संस्कार शिबिरातून करण्यात आले. यावेळी अकोले राष्ट्र सेवा दलाचे तालुका अध्यक्ष अमोल आरोटे, प्रमुख पाहुणे म्हणून विनय सावंत तर साथी नारायणराव ऐखंडे, लक्ष्मन आव्हाड, संजय शिंदे, प्रेरणा पाकिरे, शंतनू कोटकर, अनिल शेटे, विशाल पगारे, रोहित भोर, हर्षदा वाकचौरे, काजल ताजने, ज्ञानेश्‍वरी वैराट, पंकज धुमाळ यांसह आदी सेवा दल सैनिक उपस्थित होते.