अवश्य वाचा


  • Share

नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील बारावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे नैराश्येच्या पोटी तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ना .बाळासाहेब थोरात ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी सौरभ बाळासाहेब लांडगे (वय-17) हा इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे, नैराश्यामुळे त्याने 28 मे रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. गेली सात वर्षापासून बाळासाहेब लांडगे हे आपल्या कुटुंबासोबत नांदुरी दुमाला येथे आपल्या सासुरवाडीला संदीप भिमाजी शेटे व सुरेश काशिनाथ शेटे यांच्या येथे शेती व्यवसाय करत आहे. बाळासाहेब लांडगे यांना एक मुलगी एक मुलगा असा परिवार असून, सौरभ बाळासाहेब लांडगे इयत्ता बारावी मध्ये शिकत होता. 12 वीचा निकाल लागल्याने इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये सौरभ बाळासाहेब लांडगे हा परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्याने नैरश्यातून सीताराम निवृत्ती शेटे सर्वे नंबर 43 त्यांच्या शेततळ्यांमध्ये आत्महत्त्या केली असल्याचे समजते. संगमनेर तालुका पोलीस स्टेशन मध्ये ई.डी. न.54/19 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास संगमनेर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सहाने हे करत आहेत.