अवश्य वाचा


  • Share

6000 पाहुण्यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी घेणार शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रपती भवनात अत्यंत साध्या पण देखण्या समारंभात 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाला 14 राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार असून तब्बल 6000 पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनासमोरील पटांगणात हा समारंभ पार पडणार आहे. हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पार पडावा अशी इच्छा खु्द्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. शपथविधी नंतर आलेल्या पाहुण्यांसाठी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या भोजनात दाल रायसिना सारख्या भारतीय पदार्थांसोबत विदेशी मांसाहारी पदार्थांचाही समावेश करण्यात आला आहे. पूर्व आशियातील देशांचे अनेक राष्ट्रप्रमुख या कार्यक्रमात सहभागी होणार असल्यामुळे अनेक ईस्ट आशियन मांसाहारी पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. सात वाजताच्या शपथविधीसाठी दुपारी 4च्या रणरणत्या उन्हातच पाहुणे येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे पाहुण्यांना पाण्याच्या बॉटल्सही देण्यात येणार आहेत. गुरुवारी संध्याकाळी पार पडणार्‍या या समारंभासाठी मंगळवारी संध्याकाळपासूनच राष्ट्रपती भवनात तयारीला सुरुवात झाली आहे. 6000 लोकांसाठी मेजवानी तयार करण्यासाठी दोन दिवस लागणार आहेत.