अवश्य वाचा


  • Share

मर्चंट्स बँकेच्या सौर कर्ज योजनेस डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर मर्चंट्स बँकेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ संगमनेर मर्चंट्स बँकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सौर प्रेरणा कर्ज योजनेस डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेमुळे संगमनेर मधील अनेक रुग्णालये विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेली नजीकच्या काळात पहावयास मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हरितभारत योजनेत या निमित्ताने संगमनेरचा भरीव सहभाग नोंदविला जात आहे. 27 मे रोजी (सोमवारी) सायंकाळी बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात शहरातील डॉक्टरांना सौर प्रेरणा कर्ज योजनेवर चर्चा करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. डॉ. आनंद पोफळे. डॉ. राजेश भोलाणे डॉ प्रवीण पानसरे, डॉ जगदीश वाबळे, डॉ अशोक पोफळे डॉ आशुतोष माळी डॉ सुधाकर पेटकर, डॉ सचिन सातपुते, डॉ योगेश गेठे, डॉ सतीश पाटील, डॉ अजित कुलकर्णी, डॉ प्रमोद राजुस्कर, डॉ निकुंज दातीर, डॉ एम डी घुले इत्यादी व सौर उर्जा निर्मिती क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे मान्यवर बैठकीला उपस्थित होते. त्यांचे स्वागत चेअरमन श्रीगोपाल पडतानी यांनी गुलाबपुष्प देऊन मनोगत व्यक्त केले.बँकेचे मुख्य मार्गदर्शक राजेश मालपाणी यांनी प्रास्ताविकात योजनेची सविस्तर माहिती देऊन अधिकाधिक डॉक्टरांनी या योजनेचा तसेच अन्य कर्ज योजनांचाही लाभ घ्यावा असे आवाहन केले.डॉक्टरांच्या वतीने डॉ प्रवीण पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले.