अवश्य वाचा


  • Share

कर्जुले पठार शिवारात भीषण अपघात, दोन ठार ; चार जखमी - अपघातग्रस्त सर्व शासकीय कर्मचारी

घारगाव (प्रतिनिधी) अज्ञात वाहनाने शेजारुन कट मारल्याने टाटा 407 या शासकीय वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने या वाहनाने तीन-चार पलटी घेतल्या. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर चार जण जखमी झाले आहे. हा अपघात नाशिक-पुणे महामार्गावर कर्जुले पठार शिवारात आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त सर्व नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील कर्मचारी होते. जगन्नाथ पोपट संधान (वय 53), अनिल सोपान कोळी (वय 52, दोघेही रा. नाशिक) यांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला तर मनोज बोरसे, रवी मुसळे, मुजाउद्दीन शेख, नितीन सोनवणे (चालक, चांदवड) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. या बाबत समजलेली माहिती अशी की, वरील सर्व नाशिक येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील कर्मचारी जुना आग्रा रोड त्रिंबक, नाशिकयेथुनशासकीय टाटा 407 टेम्पो (क्रं. एमएच 15 एबी 59) या वाहनातुन पुण्यातील येरवडा काराग्रहातील मुद्राणलयात स्टेशनरी आणण्यासाठी जात होते. दरम्यान सदर वाहन कर्जुले पठार शिवारात आले असता शेजारून अज्ञात वाहनाने जोराचा कट मारला. त्यामुळे टाटा 407 वरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने या वाहनाने सुमारे तीन ते चार पलटी घेतल्या. रस्त्याच्या कडेला हा टेम्पो पलटी झाल्याने भिषण अपघात घडला यात जगन्नाथ संधान व अनिल कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच घारगाव पोलिस व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर जखमींना तातडीने चंदनापुरी घाट येथील डॉ. गुंजाळ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मयतांवर संगमनेर येथील कॉटेज रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सदर अपघातात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे नाशिक येथील कर्मचारी ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.