अवश्य वाचा


  • Share

केवळ प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी -

संगमनेर तालुका सुसंस्कृत व पुरोगामी विचारांचा आहे. येथील आ.बाळासाहेब थोरात यांचे सर्वसमावेशक नेतृत्व आणि येथील शांतता ही सर्वांना अभिमान वाटावा अशी आहे. मात्र काही मंडळी चमकोगिरीसाठी मोठी स्टंटबाजी करत आहे. घुलेवाडी फाटा येथे लावलेले फ्लेक्स फाटणे ही भाजपा-सेना कार्यकर्त्यांनी केलेले कृत्य असून ही फक्त प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी आहे हे सर्व घुलेवाडीचे नागरिक ओळखून आहेत. फक्त पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी केलेले हे कृत्य असून नागरिकांमधून स्टंटबाजीचा प्रकार असल्याची कुजबुज असून हे त्यांचे कृत्य फक्त प्रसिद्धीसाठी असल्याची टीका माजी सरपंच भास्कर पानसरे यांनी केली आहे